प्रश्न

अनुत्तरीत प्रश्नांमध्ये गुरफटलेला मी कर्मठ आधीर,

तुरुंगवास भोगतायेत माझ्या सोबत अनंत प्रश्न मुकबधीर !!

जग जिंकण्याची ची ताकत जरी अंगी,

हातांना केलाय प्रश्न बेड्यांनी बंदी !

गर्वात धुंद इटलीच्या रस्त्यावर,

हाती घेऊन फिरतोय सोने चांदी !

नाही मिळाली उत्तरे,

ती सोन्या चांदी पेक्षा महाग समदी !!

अनुत्तरीत प्रश्नांमध्ये गुरफटलेला मी कर्मठ आधीर,

तुरुंगवास भोगतायेत माझ्या सोबत अनंत प्रश्न मुकबधीर !!

नालायक प्रश्न बिजांच्या जोरावर उत्तराच बीज अंकुरात नाही,

स्वप्न-रंजक छायेची आस, मनामध्ये सतत कुर-कुरत राही !!

 -विनायक हंचाटे 

Leave a comment